Wednesday, February 10, 2010

Eak kavita Babansathi...

This one's for my Baba's 60th Bday from what I know him for the last 25yrs.


शब्द कित्ती गोळा करू, बोलू तरी केवढे आज,
साठी पूर्ण झाली आहे मित्राची माझ्या खास.

वार्यावरती येतो तो अन वाऱ्यासारखा जातो,
गप्पा अश्या करतो कि आम्ही हलत-डुलत राहतो .

डोकं सारख आपटत राही, नव्या शोधांची त्याला खाज,
इंजीनियारही झक मारेल अश्या आयडिया त्याच्या खास.

रस्ता माझा बनवेन मीच, असो वाळू किंवा बर्फ गार,
पाणी असेल तर झालाच कि, पोहून जाईन नदी पार.

हृदय म्हणतो "थांब जरा!", "घेउडे कि जरा श्वास".
कधीतरी विचार मला, कित्ती देशील असा त्रास!

शब्द कित्ती गोळा करू, बोलू तरी केवढे आज,
साठी पूर्ण झाली आहे मित्राची माझ्या खास.